Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक ७१
१६१७ आषाढवद्य १४

दा। बो। मोकदमानि मौजे दुसेरे पा। करहाड सु। सीत तिसैन अलफ कारणे
साहेबाचे बदगीस लेहून दिल्हा हाजीर-जमान-कतबा ऐसा जे बीजमानत बो। कासी पा। व जोगोजी पा। व नारोवा कुलकर्णी मौजे वडगाव यासि हुजूर आणून रजा फर्माविली जे तुह्मी सुभा येऊन गावीची हकीकत हाजीर करावी कस्ट मशाखत करून गाव लावावा तेथील जो आकार होईल तो सुभाचे सनदेने ज्यास देऊन त्यास द्यावा दरम्याने मुकासी ह्यणऊन कोण्ही येईल याचे फितवियात न पडावे सुभा आकार करून ज्यास देऊन त्यास द्यावे हिलाहरकत फितवा फादडा न करावा. येखादेचा जमान मागितला तरी आपण जमान असो गावीची कीर्दी मामुरी करितील जे समई सुभाचा हुकूम येईल ते वेलेसी हाजीर होतील हिलाहरकत फितवा फादडा करणार नाहीत सुरलित वर्ततील ह्यणऊन जमान मागितला तरी आपण हाजीरजमान असो सदरहूप्रमाणे वर्ततील जरी वर्तनात तरी हाजीर करून हाजीर करू न सको तरी त्याचे तालुकातीचा जाब करून हा कतबा सही (नागर)
तेरीख २७
जिल्हेज