Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक ६८
१६०२ पौष शुद्ध १०

मूळ बाळबोधीत लिहिले आहे

श्री काळभैरवप्रसन्
श्री काळभैरव साक्ष
शके १६०२ वर्षे रौद्रनाम सवत्सरे पौष शुद्ध १० दशमी तद्दिनी राजेश्री रुद्रभट्ट गिजरे याशि अपदेभट्ट गिजरे यानि खडपत्र लेहून दिले जे तुह्मी वाराणशिहुन आलेशि आणि विभाग मागितला तरि अह्मी तुह्मास भाग दिधला यास तपशिल घर व वृत्तिचे धान्य व भाडि व वृत्ति व सहितेचा भाग व देव व लिग व पश्चादि पच धातु ऐसा तृतीय भाग तुझा तुज दिला असे व सर्वाचा भाग व तोला मासा रुका अडक वडील दादा असता तुझा तुज दिला होता तो तुह्मास पावला व वृत्तिचे कागदहि तृतीय भाग दिला असे व अणाचा भाग तृतीय दिला असे व अमचा अह्मास पावला परस्परे कोणाचे कोणा सबध अर्थ अर्थ लेकराचे लेकरी सबध नाहि व यास अन्यथा करील तो देव ब्राह्मणाचा अपराधी व पचमहापातकाचा दोषी अह्मी अपल्या सतोषे तुमच्या करभागी अश अला त्यास अह्मी परसात अपल्या अशात गज दोनि पश्चम भागी वाटे कारणे दिले होते यांनतर दुर्मति सवत्सरी अधिक वदि दशमीस पत्र फालिले दोघे झगडो लागलो मग सभासतानि उभयतास समजाउन गज १ देविला वाटे कारणे गजा वेगली भीति सरदेची भिति उभयतानि यालावि यावेगलि पश्चमेची भिति रुद्रभटाची हे सत्य वळि २२ पत्र प्रमाणे अपदेभट्ट मान्य चिरास उत्तरे मिति २३

गोही पत्रप्रमाणे गिजरे तिमणभट्ट
साक्षी हरिभट वैद्य साक्षि

महादेव भट्ट वैद्य साक्षि             नरहरि भट्ट वैद्य
अपदेभट्ट वलवाडे साक्षि           माहादे भट्ट ढवली पत्रप्रमाणे साक्षि