Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखांक २८१
१७४१ चैत्र शु॥

नकल
श्री
जबानी डोगरो कासी कुलकर्णी मौजे चितळी का। निबसोड सु।। अशरीन मया तैन व अलफ लेहून दिल्ही जबानी ऐसी जे हरिपत व कृष्णाजीपत व सिवरामपत ऐसे आह्मास त्रिवर्ग पुत्र त्यास कृष्णाजीपत याचे पोटी पुत्रसतान नाही त्यास सिवरामपत यानी व त्याचे बायकूने मूल उपजले ते वेळेस वचने करून दिल्हे कृष्णाजीपत व त्याचे बायकूस दिल्हे आहे हाली त्या मुलाचा वृतबध गुलपान व्हावयाचे आहे त्यास माझे माहातारपण वृधापकाळ जाहला आहे आणि माझी आस्ता राहती ये विसी साहेबास विनति करून आज्ञा घ्यावयास आलो त्या वरून साहेबी समजून घेऊन मुलाचे गुलपान वृतबध करावयाची आज्ञा करावी हे लेहून दिल्ही जबानी सही तेरीख छ २९ जमादिलाखर चैत्रशुध १
हस्त अक्षर खुद