Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक १४०
शके १६२९-१६६८

।। श्रीविद्याशंकर।।
श्रीमत्परमहसादियथोक्तबिरुदाकितश्रृगेरीसिहासनाधीश्वर
श्रीमच्छकराचार्यान्वयश्रीविद्याशकरभारतीस्वामिकरकमल-
सजाताभिनवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि

श्रीमत्सकलगुणालकरण हरिगुरुभक्तिपरायण राजमान्य राजश्री कृष्णाजी विठल सुभेदार प्रां। कराड भक्तोत्तम या प्रति विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छित करवीरक्षेत्री छत्रसभासमवेत श्रीनिकट राहिलो असो तदनतर अत्रत्य कुशल जाणोन स्वकीय सुखानुभवलेखनद्वारा चित्त प्रमोदवीत असले पाहिजे दुसेरीक्षेत्रास आले समई आपण श्रीच्या पुण्यतिथी करिता गोदूम पाच मण मान्य केले आहेत त्यास प्रस्तुत पुण्यतिथी समीप उरली गोदूम मठास आणावे लागताती या करिता रा। वेकणभट या समागमे आशीर्वादपत्र पाठविले आहे तरी गोदूम सिध करून उत्तर पाठवणे ह्मणजे बैल पाठवून मठास आणऊ ते ब्राह्मणमुखी व्यय होतील तेणे करिता श्रेयस्कर आहे आपण मठीचे अभिमानी सच्छिष्य असा तेथे विशेष काय लिहिणे