लेखाक २६६
१७०८ फाल्गुन वा। १३
श्री
ताजाकलम करीना जबानी भिमाजी माहादेव गोसावी लेहून दिल्हा करीना ऐसा जे आपला मूळपुरुष मुधोपत १ यास पुत्र २ दोघे
वडील माहादेव गोसावी १ धाकटे बाळाजीपत १ यासी पुत्र ५
मा।र निलेस पुत्र नाही सबब भि १ बाजीपत
वाजीबावा कराडी मुज आपले १ जोतीपत
मांडीवर करून वोट्यात घेतला १ भिवजी बावा
१ कृष्णाजीपत १ सदाशिवपत
----
५
बालाजीपत यासी पुत्र च्यार जोतीपत यासी पुत्र नाही सबब भिवाजी गोसावी याचा पुत्र जोतीपताच्या वोट्यात घातला येणे प्रमाणे वाटणीचा विभाग आहे हे करीना लिहून दिल्हा सही याज खेरीज आपले बोलणे नाही जर करिता बोललो तरी वाद सागतो हा खोटा तेरीख छ २६ जमादिलावल शके १७०८ पराभवनामसवत्सरे फाल्गुनवद्य १३ त्रयोदशी
हस्ताक्षर मनोहर भिवाजी