लेखाक २०९
१५४३ माघवद्य ७
बाळबोध
श्री
नकल
क्षेत्रपाळायनम
स्वस्ति श्रीमत्कराहाटकक्षेत्रस्थ ब्रह्मवृद समस्त मिळोन समापत्र केले जे ज्या पुरातन दडक जो चालत होता तो टाकून नवीन दडक करू लागला ह्मणऊन समस्ती मान्य करून नेम केला जो पुरातन त्याचे आद्य जे चालिले असेल त्यास अधीक करू लागला तरि समस्ती मिळोन निवारावे यास चुकल जो तो गोताचा अन्यायी हेच प्रमाण पाथरेकर यानी समस्त ब्राह्मणाचा विद्यमाने लेहून दिल्ही ऐसे जे नारायणभट्ट व नरहरीभट गिजरे व पोश भट्ट ढवळीकर वअमणभट्ट क्षीरसागर या चौघा मध्ये व अपणामध्ये प्रायश्चित्ता सबधे बोली पडली अपण बोलीलो की तुह्मी चौघे पुढे होता का हे काय अहे ऐसे बोलीलो कलह जाहला त्यास समस्त ब्राह्मण बोलिले की हे चौघे समस्ताचे मुतालीक या चौघाचा अनुमत्ते समस्तानी वर्तावे शभरास बोलावयास गरज नाही त्याजवर अपण स्वस्ताक्षर लेहून दिल्हे असे यास जो कोणी अन्यथा करील तो ब्राह्मण निराळा
१ या लेखाकापासून क्षेत्रमाहात्म्यसबधी पत्रास सुरुवात झाली आहे
नरहरीभट्ट गिजरे पत्रा प्रमाणे पत्राप्रमाणे सकभट्ट, ढवलीकर