लेखाक १४१
शके १७१६ वैशाख शु।। २
।। श्री शकर ।।
श्रीमच्छकराचार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्याशकरभारती-
स्वामिकरकजोद्भवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामिकृतनारायणेन - स्मरणानि
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद विद्वज्जन व राजकीय गृहस्थ व व्यवसाई गृहस्थ व वास्तव्य क्षेत्रकरहाटक परमभक्तोत्तम यासी विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छित छात्रसभासमवेत श्रीनिकट असो अत्रत्य कुशल जाणोन स्वकीय लेखन करीत असले पाहिजे या नतर वैशाख वद्य नवमीस श्रीआ( चा) र्य याची पुण्यतिथी, ब्राह्मणसतर्पण वार्षिकी उत्छाह मठसिरगावी वाळवे नजीक कृष्णातीरी आहे तर तुह्मी सर्वत्र तीर्थप्रसादास येणे अनमान न करावा अगत्य यावे तैसे क्षेत्रमजकुरी सस्थानास इनाम जमीन आहे त्याचा ऐवज सस्थानी येऊन पावत नाही जाणून लिहिले आहे तरी इस्तकबील पासून ऐवज राहिला असेल तो पाठवून द्यावा ये विसी आळस न करावा विशेष काय लिहिणे.
माहानुशासन वरीवर्ति
पौ। मिति शके १७१६ वैशाख शु।। २
हस्ते सखाराम पोवार