लेखाक १३६
श्री
माहाराज राजाधिराज राजमान्य राजश्री पत अमात्य स्वामीचे शेवेसी
विनति सेवेसी सेवक रुद्राजी चदो देसकुलकर्णी पा। क-हाड कृतानेक सास्टाग नमस्कार विनति क्षेम ता। छ ७ माहे जिलकाद पावेतो सेवकाचे वर्तमान माहाराजाचे कृपादृस्टी करिता यथास्तीत आसे माहाराजानी कसबे क्षेत्रीच्या ब्राह्मणास मौजे सैदापूर त्याचे नाव सिवापूर ठेऊन अग्रहार करून दिल्हे ते क्षेत्रा समीप वाधताती ब्राह्मणास गावीची उपजीविका होऊन येई ना ह्मणौऊन ब्राह्मणानी सागीतले त्या वरी स्वामी कृपाळू होऊन मौजे आटके दिल्हे त्या पत्रा निमित्य माहाराजा पासी वेदमूर्ती मोरेश्वर भट व समस्त ब्राह्मण आले आहेत मौजे मजकूरची चावर ३६।१८ बि ता।
आवल जमीन चावर दूम जमीन चावर सीम जमीन
२०१० १३
१८ ३
२०
देखील प्राचीन इनामदार आहे तेथील पाटील पलाले आहेत त्यासी आणावयाचे यत्न केला आहे तो गाऊ दोनी तीन वरसे खराब पडिला आहे स्वामीस ब्राह्मणाचा अभिमान आहे पत्र करून द्यावयास स्वामी समर्थ आहेत बहुत काय लिहू सेवक असे ही विनति