लेखांक १०९
१६४४ वैशाख शुद्ध ७
श्री
अखडितलक्ष्मीअलकृत राजमान्य राजश्री माणको कृष्ण गोसायी यासि सेवक आबुराव अमात्य नमस्कार सु॥ इसन्ने अशरीन मया अलफ वेदमूर्ती गोपालभट व केशवभट गिजरे याचे जोतिसपणाचे गाव मौजे कारवे व वडगाव व सेरे हे तीन गाव आहेत याच्या वडिलानी शामभट प्रथमशाकी मतालिकास ठेविले होते ते प्रस्तुत यासि भाडतात हा कजिया रा।। चिमणाजी पताकडे गेला होता त्यानी तुह्यास निवडावयसि सांगितला आहे ह्यणोन यानी विदित केले तरी त्यानी तुह्मास सांगितले असेल तरी तीन गावचे वतनदार बोलाऊन आणून जो काय करीना असेल तो मनास आणून चिमणाजीपताकडे लेहून पाठवणे जाणिजे छ ५ रजबु
मोर्तब सुद