लेखाक ६५
१५९४ पौष शुद्ध ३
अज दीवाण ठाणा कर्याती कासेगाऊ किले पनाला ता। मोकदमानि देहाय मौजे तादले मौजे रेटरे का। मा। सु।। सन सलास सबैन अलफ दरी विले नरहरिभट बिन अतीभट गिजरे मा। पा। क-हाड यानी हुजूर एऊन मालूम केले जे आपणास इनाम धर्मादाऊ होन २६ असे ता। साल गुदस्त चालिले असता हाली साल मा। ताजा मिसलीचे उजूर करिताती ह्यणौऊन मालूम केले बराये मालुमाती खातिरेसी आणून मिसेली सादीर केले असे तरी इनामदार मजकुराचे होन २ दोनी बि ।। मौजे तादुले होन १ मौजे रेटरे होन १ बा। सालाबाद ता। साल गुदस्त प्रमाणे आदा करणे तालीक लेहून घेऊन असल परतून दीजे दरी बाब कुली ताकीद असे पेस्तर याचे फिरयादी येऊ न दीजे फिरयादी आलिया तुह्मी जाणा मोर्तुब सुद
तेरीख १ माहे रमजान
रमजान