लेखाक ६०
१५८३ पौषशुद्ध ११अज् रख्तखाने राजश्री जाधवराऊ राजे राजेसाहेब खूलेदयामदौलतहू बजानेब कारकुनानि पा। क-हाड बिदानद सु।। सन इसने सितैन अलफ दरी विले आपदेऊ भट बिन कृस्णभट जुनारदार हुजूर एऊन मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर ॥
दर सवाद मौजे कोणेगाऊ पा। मा। देखील महसूल नख्तयाती व जमील वा जिमाती व वेठबीगार व
फर्मासी कुल उजुहाती बा। फर्मान पारसी व भोगवटे वजि रानि कारकीर्दी दर कारकीर्दी सालाबाद चालत आले असे हाली पा। मा। साहेबास मुकासा अर्जानी जाला माहाली कारकून ताजा खुर्द खताचा उजूर करिताती साहेबी नजर एनायत करून दुमाला खुर्द खत म-हामत केले पाहिजे. मालूम जाले तरी सदरहू। इनाम जमीन चावर ॥ बा। फर्मान हुमायून व भोगवटे वजिरानि कारकीर्दी दर कारकीर्दी सालाबाद तसरुफात ता। साल गुदस्त चालत आले असेल तेणे प्रमाणे खातिरेसी आणून दुमाला करणे बअवलियाद व अफलाद चालवीत जाणे दर हर साल ताजा खुर्द खताचा उजूर न कीजे तालीक लेहून घेऊन असल खु।। जुनारदार मजकुरास फिराऊन देणे पा। हुजूर रा। मा। आनदराऊ .
तेरीख ९ माहे जमादिलावल
जमादिलावल फारसी मोर्तब