लेखाक २५
१६४० मार्गशीर्ष शुद्ध २
श्री
राजश्री विठोजी सिर्के गोसावियासि
सकलगुणालकरण अखडितलक्ष्मीआलकृत राजमान्य श्री जोत्याजी केशरकर आl सरदेशमुख रामराम विनति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत गेले पाहिजे विशेष सरदेशमुखीचे वतन राजश्री स्वामीचे चालत आले आहे तेणे प्रो हाली पातशाहानी स्वामीचे स्वामीस बाहाल केले आहे ऐशास मामले प्रभावली व मामले दाभोल येतील सरदेशमुखीचे वतन राl गणोवानाईक व विसोवानाईक याचे पुरातन वशपरपरेने अनभवीत आले आहेत तैसे स्वामीनी याचे यास करार करून दिल्हे आहे आणि कोकणप्राते राजश्री स्वामीचे वतनाची कमावीस असली पाहिजे या बदल प्रभावली व दाभोल या
दोन्ही मामलियात खासा राजश्री स्वामीचे वतन सरदेशमुखीचे नूतन राजश्री स्वामीनी मोकरर करून या वतनास हक रयत निll पचोत्रा मोईन केली आहे व गणोवानाईक व विसोवानाईक सरदेशमुख मामले माlर यास कदीम हकलीजिमा इनामत असेल ते चालवायाची आज्ञा राजश्री स्वामीनी केली आहे तरी तुह्मी मामले प्रभावली येथील सरदेशमुखीचे वतन पूर्वी पासून याचे चालल्या प्रोl चालविले पाहिजे ये विसी राजश्री स्वामीचे आज्ञापत्र सादर आहे
तेणे प्रोl याचे वतन यास चालविले पाहिजे छ १ मोहरम हे१ विनति १