लेखाक २३
१६३२ भाद्रपद वद्य ३०
श्री
आज्ञापत्र राजश्री पतप्रतिनिधी ताl कमावीसदार मौजे बुरबाड ताl सगमेस्वर सुहुरसन इहिदे अशर मया व अलफ मौजे मजकुरी इनाम लारी
श्रीदेव नरसीह माहालुगे वेदमूर्ति शाभट सफरे
५० १००
येणे प्राl दीडसे लारीची वृती पेसजी पासून आहे त्यास तुह्मी कथला करून चालवीत नाही ह्मणोन कलो आले तर या उपरी हे आज्ञापत्र सादर केले असे तरी सदरहू वृती पेसजी पासून चालत आली आहे त्या प्रोl चालवीत जाणे गै केली ह्मणजे ताकीद होईल जाणिजे छ २८ रजब पाl हुजूर
बार