लेखाक २२
१६३२ भाद्रपद वद्य ३०
श्री
तालीक
राजश्री नामाजी गाइकवाड हवलदार व कारकून जजिरे रत्नागिरी यासि /
अखडितलक्ष्मिअलकृतराजमान्य श्री गदाधर प्रल्हाद प्रतिनिधी असीर्वाद
व आनुक्रमे नमस्कार सुll इहिदे आशर मया व आलफ बाग निवे खाले कर्यात नेवरे हा बाग राजश्री गणोवा नायक सरदेसाई मामले प्रभावली व दाभोल यास इनाम करून दिल्हा ये विसी पेशजी तुह्मास राजपत्रे सादर आहेत तेणे प्रोl माlर निल्हे कडे इनाम चालवणे त्यास तुह्मी यास ह्मणता की आपणास मुबदला ऐवज आणून द्या ह्मणोन यासि कटकट करिता ऐसे हुजूर विदित केले तरी हुजुरून राजश्री स्वामीचे आज्ञापत्र सादर आहे त्या प्रोl बिलाकुसूर माlरनिल्हेकडे इनाम चालवणे ये विसी फिरोन बोभाट येऊ न देणे जाणिजे छ २८ रजब पोl हुजूर