लेखाक २१
१६३० कार्तीक वद्य ६
श्री
स्वस्ति श्री राज्याभिषेकशके ३५ सर्व-धारीसवत्सरे, कार्तीक- बहुलशष्ठी मदवासरे क्षत्रियकुलावतस श्री राजा शाहुछत्रपती स्वामी याणि राजश्री गणावा नाईक सरदेसाई मामले प्रभावली यास आज्ञा केली ऐसी जे राजश्री तिमाजी वेकटेस सभासद सेवक राl याचे लग्नानिमित्य रुपये अडीचसे सगमेश्वर तर्फ पैकी देविले आहेत सनद आलाहिदा सताजी दामोदर याचे नावे सादर आहे ऐशास याचे चालवणे स्वामीस अवश्यक आहे हे जाणून सदर ऐवज सनद प्रमाणे + + + + + + + + + + + न करणे जाणिजे
रा। छ २१ साबान सुरु सूद