लेखाक २०
१६२९ फाल्गुन वद्य ७
श्री.
स्वस्ति श्री राज्याभिषेकशक ३४ सर्वजितसवत्सरे फालगुन-बहुल- सप्तमी भौमवासरे क्षत्रियकुलावतस श्रीराजा शाहुछत्रपति स्वामी राजश्री गणोवानाईक सरदेसाई मामले प्रभावली यासि आज्ञा केली ऐसी जे तुह्मी विनतिपत्र पाठविले प्रविष्ट होऊन लिहिले वर्तमान आपले एकनिष्टेचे ते विदित जाहाले व तुमचे विशी राजश्री कृष्णाजी परशराम याणी स्वामीचे सेवेसी लिहिले त्या वरून स्वामीने तुह्मास अभयपुरसर हे आज्ञापत्र सादर केले असे तरी तुह्मी स्वामीचे दर्शनास येणे तुह्मी स्वामीचे राज्यातील वतनदार आहा तुमचे हाते प्रयोजन घेऊन स्वामी सर्वविशी चालवितील गोमटे करितील आपले समाधान असो देणे जाणिजे निदेश १ समक्ष