लेखांक १०] [१६२० फाल्गुन वद्य १०
श्री
राजश्री देसकानी व सेटियानि व माहाजन कसबा प्रभावली यासि दादाजी कान्हो सभासद नामजाद कसबे मजकूर सुll सलास मया अलफ सगया गोसावी मठ शीहासन कसबे मजकूर येऊन विदित केले जे राजश्री रामचद्र पडित अमात्य याणी पड जमीन इनामत करोन मठास दिलीं व आपला हि अवकात चालावा व श्रीदेवास हि नेवेद चालावा ह्मणून चतुसीमा करोन पत्र दिले ते पत्र हाली ताब्राचे धामधुमी मधे ह्मालीची पत्रे होती ती हिं हरपली त्यास आपणास भोगवटेयास पत्र पाहिजे राजेश्री पत अमात्य याचे पत्र व देसचतुसीमेचे पत्र आहे ते मनास आणून आपणास चतुसीमा करोन दिले पाहिजे बिll सनद राजश्री पत आमात्य छ २५ रमजान सन तिसा तिसैन अलफ व चतुसीमाचा हि कागद देसकाचा ठिकाण रिगेचे भाटी जमीन बिघे
२ अर्ज २७ तुल ३० एकून ८१० वजा बद पाली १० बाकी ८०० एकून बिघे
२ ह्या कागदाचे सक छ १ सौवाल सुll सन तिसा तिसैन येणे प्रमाणे पत्र करोन दिले आहे सगोवा गोसावी कीर्दी करोन देवास नवेद वा आपले हित व काल चालवितील येणे प्रमाणे तुमी चालवीत जाणे खेरीज हकदार करोन दिले असे प्रतिवरुसे तालीक लिहोन घेऊन मुख्यपत्र सगया गोसाविया जवल देणे नूतन पत्राचा आक्षेप न करणे छ १ जिल्हेज