लेखांक ९] [१६२० फाल्गुन वद्य १०
श्री
नकल
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके २५ बहुधान्यसवत्सरे फालगुन बहुलदशमी गुरुवासरे क्षत्रियकुलावतस श्रीराजाराम छत्रपती याणी राजश्री माहादाजी बलाल सभासद नामजाद सुभा दाभोल यासी आज्ञा केली ऐसी जे स्वामी करनाटकास मसलतेस जाते समई लस्कराने वतनाचे किते मुदे घातले त्या प्रमाणे त्याचे समजाविशी निमित्य वतनाचे कागद करून दिल्हे आहेत ये गोस्टीने एकाचे वतनास एक कथला करावयास उभा राहिला आहे ह्मणून कलो आले तरी चदीच्या प्रसगे व मसलतेच्या प्रसगे समजाविसी निमित्य वतनाचे कागद ज्याणे जैसे मागितले त्यास तैसे दिल्ह्ये काही प्रमाण नाही या करिता पूर्वील सनद पत्रा वतनाचेविसी घेऊन येईल अगर एकाच्या वतनास दुसरा कथला करील त्यास ताकीद करून कागदपत्रा निसी हुजूर पाठऊन देणे स्वामी राजश्री कोनेर पडित न्यायाधीश यास आज्ञा करून बरहक मनास आणून तुह्मास आज्ञापत्र सादर होईल त्या प्रमाणे वर्तणूक करणे तो वर नूतन वतने एकादर कोण्हास न चालवणे कैलासवासी स्वामीचे वेलेस ज्याचे वतन चालिले असेल त्यास बिलाकुसूर चालवणे या कामास नाइक निढोका अफराद दिमत लबे यास वेचास लारी ६ रास आदा देविले असे देणे जाणिजे
शालिवाहन शके १६२० बहुधान्य सवछर सन तिसा तिसैन व अलफ या सालातील ताकीद१