Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)

लेखांक ५४                                                                                                                    १५९४ श्रावण शुध्द १                                                                                                       
                                                                                                                                                         नकलेची नकल

महजर शके १५९४ विरोधीकृतनाम संवछरे श्रावण शु॥ १ पाडवा ते दिवसी वाटणी जाली ऐसी जे बिहुजूर बितपसिल

कारकून प्रांत मजकूर →पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा

सु॥ सालस सबैन अलफ या विद्येमाने वाटणी जाली ऐसी जे विठोजी बी॥ गाखोजी व बापुजी बी॥ बाजी व बरवाजी बी॥ आपाजी व लखमाजी बी॥ अपाजी निगडे प्रा। मजकूर हे आपआपणामधे वृत्तीबदल भाउत होते ऐसीयासी हुजूर जाऊन राजश्री साहेब बदगीस आपली हकीकत कुल सागून साहेबी मनास आणून आपणास कारकुनाचे नावे खुर्दखत देऊन माहालास पा। माहली कारकून व गोत श्री देव याचे देवळी बसोन समजाविश केली त्याप्रो। आपण चालावे आपला हक कजीमा इनाम एकूण बेरीजेची वाटणीचा तह दिल्हा देहे ५ बी॥

हक गाव गनां →पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा

या खेरीज तूप बीज जुते बकरे नीमे

सदरहूप्रो। वाटणी करून दिल्ही असे याप्रमाणे लेकराचे लेकरी खाऊन सुखरूप असणे दिवाणातून तश्रीफ मानपान विठोजीस दिल्हे असे त्यावर बहीरजी बीन अपाजी निगडे यासी विचारिले की तुह्मी महजर दाखविला त्यात वडिलपण विठोजी बीन गोरखोजी याजकडे लागले असता तुह्मी वडिलपण अनभविता याचा विचार काये आहे तो सागणे त्यावरून बहिरजी निगडे बोलिले की विठोजी बीन गोरखोजी यानी वाटणी केली तेसमई आपला बाप अपाजी बीन मलजी चदीस गेले होते ते तिकडे च च्यार पाच वरसे होते तिकडून गावास आलियावर सावे वरसीं विठोजी बीन गोरखोजीस बोलिले की मी वडील असता तुह्मी वडिलपण आपल्या नावे काढिले याउपरी तुह्मी आह्मी हुजूर रायगडास माहाराज राजश्री स्वामी थोरले साहेबसनिध जाऊन तेथे तुमचा आमचा निवाड होईल ह्मणोन दोघे हि निघोन कसबे. हरणसास ता। वेलवड खोरे येथे जाऊन राहिले तेथील देशमुखानी उभयतास वर्तमान विचारिले की तुह्मी कोठे जाता त्याजपासीं उभयतानी आपले वर्तमान सागितले त्यावरून तेथील देशमुखानी उभयतास वर्तमान विचारिले की तुह्मी कोठे जाता त्याजपासी उभयतानी आपले वर्तमान सागितले त्यावरून तेथील देशमुखानी उभयतास पुरसीस केली की तुह्मी दिवाणात जावे ऐसे नाही आह्मी व गोत बसोन हे स्थळी तुमची समजावीस करून त्यास रजावद असिलेस तरी राजिनामे लेहून देणे त्यावरून उभयताने राजी होऊन राजीनामे लेहून दिल्हे त्यावर गोताने ये गोष्टीचा मजकूर मनास आणून उभयताची समजावीस करून महजर अपाजी बीन मलजी याजपासी देविला तो त्यानी दिल्हा दोन महजर आपल्या बापापासी दिल्हे त्या ता। आपाजी बीन मलजी वडिलपण आनभवित आले ते मृत्य पावले त्याचे मागे आपण हि वडिलपण अनभवितो त्याजवरून बहिरजी निगडे यासी विचारिले की हरणसच्या गोताचा महजर दाखवणे यावरून त्यानी गोत महजर आणून दाखविला तेथें मजमून बितपसिल

महजर शके १६०२ रौद्रनाम सवत्सरे मार्गस्वर वद्य अष्टमी सुक्रवार ते दिवसीं हजिर मज्यालसीस स्थल कसबे हरणस ता। वेलवंडखोरे → पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा

येणेप्रमाणे हर दो जणानी तकरिरा लेहून दिल्ह्या यावर समस्त गोतवाले ब्राह्मण मिलाले श्रीच्या देवली बैसून मनसुबी मनास आणिता अपाजी बी। मलजी नाईक निगडे वडिल घर होय विठोजी बी। गोरखोजी धाकटे घर होय ऐसे असोन विठोजी बी। गोरखोजी निगडे यानी वडिलपणाचा कारभार केला तरि ये गोष्टीस बहुतसे काही अतर पडिले नाही कारभार केला तरी ये गोष्टीबदल वडिलपण कोण्ही घेणार नाही मग हर दोजणास जमान घेतो विठोजी बी॥ गोरखोजी यात जमान कृष्णाजी नाईक सिलीमकर देशमुख ता। गुंजण मावल व आपाजी बी॥ मल्हारजी नाईक निगडे यासी जमान राघोजी बी॥ कृष्णाजी डोहार वेलिसदार देशमुख मौजे जोगवडी ता। वैलवड खोरे ऐसे जमान गेतले जे गोत न्याये निवाडा होईल तेणे प्रो। वर्तावे त्यास हिलाहरकती करील तो गोताचा खोटा दिवाणचा गुन्हेगार असे कतबे लेहून मग सदरहु दोघाजणाचा बसून निवाडा केला ऐसा जे अपाजी बी॥ मलजी निगडे वडिल घर यासी मानपान विडा टिला व सिका सांगर व वडिलपणास जमीन एक चावर व पाच होन आहेत ते खाऊन वडिलपणाचा कारभार करावा व विठोजी बी। गोरखोजी निगडे धाकटे घर यासी काहीं वडिलपणासी व कारभारास समध नाही आपले तक्षीम धाकटेपणाची जे येईल ते खाऊन असावे ऐसा निवाडा करून हरदोजणाचे प्रमाणे महजर केला असे यासी हिला हरकत जो करील तो गोताचा खोटा दिवाणचा गुन्हेगार व दिवाणात वण होन ५०० पाचसे देणे सु॥ इहिदे समानीन अलफ हा महजर सही