Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २५८ १५९६ श्रावण शुध्द १
१ सके १५९६ आणंदनाम संवछरे श्री-
२ वण सुध पाडवा तदिवसी धनिको
३ नाम विठोजी बीन सोकरावा कुलकर्णी
४ मौजे गोडेगौ पा। संगमनेर यासि रि-
५ णको नाम तानाजी पा। मो। व बापूजी
६ जुपेढा मौजे मा। अलदुसी राजी
७ होउनु लेहोनु दीधले ऐसे जे तुह्मापासु-
८ न घेतले रुपये ८८५ आठसे पंचा-
९ सी यासी तुह्मास मौजे मा। ची कुलकर-
१० ण खइनु दीधले रुपये २५० अडीच-
११ शावर खइनु कुलकर्ण दीधले असे बा-
१२ की रुपये ५३५ पाचसे पचतीस राहि-
१३ ले हे रुपये कुलकर्णाचे सीरी आपण
१४ घेतले असेत णुबार मौजे मा। रीचे
१५ कुलकर्ण मीरासी करुनु दीधले असे
१६ हे लिहीले सही आधी रुपये घेतले म-
१७ ग खत लेहोनु दीधले तुह्मी कुलकर्ण
१८ मौजे मा।रीचे लेकराचे लेकरी कुल-
१९ कर्ण करुनु उत्पण खाने व मुशा-
२० हीरा खाते नादणे भोगणे अर्जानी करणे
२१ सदरहू रुपये बेरीज आठसे पंच्या-
२२ सी घेतले असेती यासी कोण्ही
२३ बीलाहरकती करील तो गोताचा*