लेखांक २८१ श्री १६०२ आश्विन शुध्द १
स्वस्ति श्री राज्याभिषेक शक ७ रौद्र नाम सवत्सरे आश्विन शु॥ प्रतीपदा इदुवासर क्षत्रियकुलावतस श्री राजा शभु छत्रपति याणी राजश्री गणोराम देशाधिकारी व देशलेखक प्रात कुडाळ यासी आज्ञा केली असी जे तुह्मी हुजूर येऊन स्वामीस विनति केली की राजश्री मौनी गोसावी पाटगावी रहातात बहुत थोर ईश्वर पुरुष आहे त्यास पालखी आहे परतु नेहमी भोई नाहीत तरी नेहमी भोई व वाजत्री नेहम करून देविले पाहिजे यावरून वरशास भोयास व वाजत्रियास मोईन होन निशाणी १२५ सवासे करून दिले आहेती यात भोई व वाजत्री ठेऊन देणे ते सेवा करितील तुह्मी सदरर्हू पैके तुरुतगिरी शिष्य गोसावियाचा आहे, त्याजवळ पावीत जाणे ते भोयास व वाजत्रियास हक पावितील सदर्हू मोईन ई॥ सालमजकुरापासोन केली असे यासी वाजत्री तुह्मी ठेविली आहे भोई ठेऊन देणे आहे यैसीयासि वाजत्री ज्या दिवसापासून सालमा। ठेविले असाल ते दिवसापासून वाजत्रियास वरशास पचवीस होनप्रमाणे पाववणे उरले शभर होन यासी भोई ज्या दिवसापासून ठेवाल ते दिवसापासून सालमाचे हक पाववणे पुढे सदर्हू शभर होन भोयास व पचवीस वाजत्रियास याप्रमाणे साल दर साल पावीत जाणे आणि धर्मार्थ ह्मणून गोसावीयाचे नावे खर्च लिहीत जाणे ताजा सनदेचा उजूर करीत न च जाणे गोसावी कुशल असतील तो ठेवीत जाणे असल गोसावीयाच्या शिष्यापासी देऊन तालीक सुभा विले लावणे सदरहू सवासे होन निवल देविले आहे, तियासी वजावाटाव माफ असे लेखनालंकार
रुजु सुरुनिवीस
रा। छ १६ माहे रमजान
छ २९ शाबान माहे शाबान
सुरू सूद बार बार
श्रीशंकर पौ। छ २९ रमजान