लेखांक २७४ श्री १६२४ मार्गशीर्ष शुध्द १२
॥ मा। अनाम हवालदार व कारकून ता। कर्याती मावळ यांस शंकराजी नारायण सचिव सु॥ सलास मया व अलफ मा। रायाजी इतबारराऊ सरनाईक घेरा किले सिंहगड यांणी पूर्वी केले मा। गनीमापासून हस्तगत केला ते समई स्वामीकार्यावरी एकनिष्ठेने राहोन तरवारेची शर्ती करावयाची ते करून किला गनीमापासून हस्तगत केला हे घेराचे वतनदार एकनिष्ठ या करिता यांस नूतन इनाम मौजे खांबगाव ता। मा।र पैकी वाडी खरमरी जमीन कास टके २ दोनी टके कास खो। इनामदार व हकदार वजा करून कुलबाब कुलकानू सदरहू जमीन इनाम करून दिल्ही असे तरी तुह्मी सदरहू इनाम जमीन यास नेमून देऊन पुत्रपौत्रादिवंशपरंपरेने इनाम चालवीत जाणे प्रतिवर्षी ताजे सनदेचा उजूर न करणे तालीक लेहून घेऊन असल सनद भोगवटियास परतोन देणे छ १० रजब