अक्षी - पाटील
लेखांक २६९ १५५३ पौष वद्य ५
अजरख्तखाने खुदायवंद खाने खुदायवंदखाने अजम सैफखान खुलीदयामदौलतहू बजानेबु कारकुनानी हाल व इस्तकबाल व देसमुखानि मामले मूर्तजाबाद बिदानंद सु॥ इसन्ने सलासीन अलफ मुतालिकानि हुसेन बिन काजी महमद बेनफी मालूम केले जे - मशारनिलेस रोजमुरा दरोज लारी २ बफर्मान बसिके खास आहे यासि तनखा मो। मा। गौडी तपे झीराडी व वढरहू तपे बह्मणगौ प्रांतवार या तसुरफाती ता। हालकू चालले आहे हाली साहेबास मुकासा अर्जानी जाला आहे माहाली कारकून ताजया खुर्दखताचा उजूर करताती व देहाय मजकुरीहून महसूल व पटीआ उचापती केली आहे फीराउनु मुबदला आणिके जागाहून देविले पाहिजे पेस्तर सदरहू तनखा उचापती न करणे ह्मणोउनु मर्हामती केले पाहिजे तरी काजी हुसेून बिन काजी महमद बेनफी यासि रोजमुरा दरोज लारी २ तनखा मौजे नांदगाऊ तपे झीराडी व मौजे वढरहू तपे बह्मगणौ बफर्मान दोसाले सन सलासहून तालीक लेहोन त्या प्रमाणे माहालेस आदा करीत जाणे सदरर्हू तनखापैकी उचापती केली असेल ते ठाणाहून मुबदला आणके जागेपैकी दीजे पेस्तर याचे तनखा उचापती न कीजे तालीक घेउनु असल फिराउनु दिजे मोर्तब
तेरीख १८ रुजू सूरू निविस
जमादिलाखर माहे जमादिलाखर