लेखांक २६८ १५९६ ज्येष्ट वद्य २
अज रख्तखाने सुदायवंद सुजाअत व सफाअत दस्तगाह सेख अजम लस्किरी मिया सेख मुस्तफ मुजेदी साहेब दामदौलतहू ता। देसमुखानि पा। मंगळवेढा बिदानंद की हर्ची सुहुरसन खमस सबैन व अलफ तुह्माकरिता नागणीयाने दावा करून विलायती खराब केले त्यास किती मदत करावे तितुके केले त्याकरिता भले भले लस्किरी ठार जाहाले दोनी सेहे घोडे व इसम पा। मा। मधे मोकाम ठेविले आहे तुह्मी मा। मा। विलायती रयत बहुत वजा दिलासा करून संचणी घेऊन कीर्दी मामूरी होए ऐसे कीजे यावरून तुमचे सरफराजी असे तुह्मी पहिलेपासून दिवाणचे दौलतखाह असा आता नागणियाचे दावाकरिता रयत रजीस जाहले असेलीया त्यासी बहुत वजा दिलासा करून कीर्दी मामूरी करवणे यावरून कुली तुमचे मुजरा होईल
रुजू सरखेल
तेरीख १९ माहे रबिलोवल