लेखांक २६० १६०९ ज्येष्ठ शुध्द १
१ शके १६०९ प्रभवनाम संवछरे ज्येष्ठ सुद प्रती
२ पदा तदिनी वेदमूर्ति राजश्री दामोदर भट
३ धर्माधिकारी सो। पुणताबे यासि प्रती राजश्री
४ महीमाजी राजे वलद माणकोजी राजे सीदे वृत्ति-
५ पत्र लेहोन दीधले ऐसे जे तुह्मास आपण पु-
६ ण्यस्तंभीचे तीर्थपुरोहितपण दीधले
७ आहे तेथे आलियावर तुह्मास मान्य करून आपले
८ वंशीचे ही जे कोण्ही तीर्थास येतील ते तुह्मास
९ मान्य करितील हे वृत्तिपत्र लेहोन दीधले
१० सही सु॥ हजार १०९७ *
तेरीख १२ माहे साबान