लेखांक २५९ १६०७ माघ शुध्द ७
१ श्रीसके १६०७ क्रोधननामसंवछरे माघशुध्द सप्तमी बु-
२ धवार तदिनी रा। वेदमूर्ति दामोदरभट धर्मा अधिकारी साकीन
३ पुनताबे यासि रा। तीपाजी राजे पांढरे याणी लेहुन दिल्हे
४ ऐसे जे तुह्मास तुमचे स्तलचे तीर्थउपाधीक दिल्हे
५ अस तुमच्या गावास आलिया पूजन तुमच करावे उपाधी-
६ क तुह्मास द्यावे आपले वंसीचे जे येतील त्यानी तुमचे
७ घरी राहावे हे लिहिले सही१
(फारसी)