लेखांक २४६ श्री १५९२ ज्येष्ठ वद्य ३
राजश्री गंगाजी मुदगल हवालदार व कारकून पा। सुपे गोसावी यासि
.॥ अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य सेवक निलो सोनदेऊ नमस्कार विनंति सु॥ इहिदे सबैन अलफ पा। मजकुरी राजश्री माहादाजी गोसावी याचा इनाम आहे तरी + + + + + + जेणेप्रमाणे चालिले असेल तेणेप्रमाणे हाली चालो देणे याचा इनाम यासि पावे ते करणे रा। छ १६ मोहरम व माजी आह्मास सुपे मोकासा होता तेव्हा यासि जे पावत होते तेणे च प्रमाणे हाली पावत जाणे