लेखांक २२३ श्री
तालीक
माहाराज राजमान्य राजश्री बाउजीपंत साहेबांचे सेवेसी
.॥ अर्दास दर बंदगी स्थापित समस्तं ग्रहस्तं पेठ का। आंबेजोगाई अर्जदस्त विनंति बा। ता। छ २५ माहे सफर माहाराजाचे दयेकरून पेठ मजकुरी खईरसला असो माहाराजे मेहेरबानी करून बडवे व बेणारे क्षेत्र पंढरपूरयाचे निवाडियाचे विशई आज्ञापत्र लिहिले तरी या उभायताच्या सनदपत्र पाहाता तेथे खरे खोटे केले जात नाही यानिमित्य उभयता हि महाराजापासी आले आहेती माहाराज सर्वज्ञ आहेती आणि क्षेत्र हि समीप आहे बडवे तो येथून न पुसता गेले आहेती सेवेसी स्रुत होय येथे उभयताचे निवाड जाहाला नाही सेवेसी स्रुत होय हे अर्दास
साक्षी
पदमणा १ निंबाजी भातलवंडे १ माहादाजी भा। १
गोमाजी विठल १ येसाजी नरवणे सुलतानजी साबणकर १
विसाजी भा। १ शाहमली साबाणकर १
एकून बहुत साक्ष