लेखांक २२२
श्री बडवे व उतपात व पुजारे व दर्मादाय व डीगरे व परिचारक व हरिदास व डांगे व दिवटे व समस्त ब्राह्मण क्षेत्र पंढरपूर प्रति जसवंतराउ नमस्कार विनंति उपरी तुह्मी कागद पाठविला तो पावोन सकल अभिप्राय मनासि आला आराधेयानी आपणासि भय उपजविले आहे की जातरेमधे काय करितो ह्मणोन शंका उपजली आहे याबदल तमवतीचा कागद पाहिजे ह्मणोन लिहिला तरी बाअमल कुली गलथ असे तुह्मी स्नानसंध्या करून आपलालिया वृती चालऊन सुखे आसणे जो कोण्ही ऐसे बोलिला असेली त्याणे झकी मारिली व गू खादला तुह्मी काही चिंता न कीजे कामाचे बोलावरून दिलगीर न होणे छ ७ माहे सफर सन तीस