लेखांक २२०
सत्याभिनवतीर्थाचे नकल
श्रीमत्परमहंसपरिव्राजकत्वाद्यनेकगुणसंपन्न श्रीमद्रामचंद्रदेवदिव्यश्रीपादपद्माराधक श्रीमत्सत्यनाथतीर्थ श्रीपादकरकमलसजात श्रीमत्सत्याभिनव तीर्थ श्रीपादस्वामी यानि आह्मास परमप्रिय्यशिष्य पांडुरंगस्छाशेषविद्वद्वैदिक महाजनास तथा शेष ग्रंहस्थास श्रीमन्नारायणपूर्वक परमानुग्रहकडून लिहून पाठविले निरूप अह्मी श्रीस्वामीचे परमानुग्रहकडून स्नान देवतार्चन व्याख्यान करून विक्रम नाम संवत्सर आषा(ढ) शुध्द ५ दिवसि क्षेम असो तुमचे क्षेम लिहावे रामाचार्ये पांडुरंगपासून कित्तेक देशाचे अधिकार करित होत ते अधिकार काडून टोणपे माधवाचार्यास आचार व्यवहार प्रायश्चित्त मठचे यावन्मर्यादा अह्मी दिल्हे असो त्याप्रकारे त्यानी सांगीतलेप्रमाण ऐकून याचे विद्यमाने प्रतिवर्षास देवपूजास अनुकूल करून देऊन यास बहुमानपूर्वक चालत आले पाहिजे तुह्मी मठास परमाभि(मा) नी आहा यास विशेष काय लिहाव गंध प्रसाद मत्राक्षता पाठविला हे घ्यावे वरकड वर्तमान अनताचार्ये सांगता मनास येतील इति निरूप