लेखांक २१६ श्रीविठलप्रसन १६१८ श्रावण वद्य ३
माहाजर बेतरीख छ १६ माहे मोहरम क्षेत्र पढरपूर पा। कासेगाउ सु॥सन सन हजार ११०६ बि॥ हाजीर मजालसी बि॥
राघोजी गोपीनाथ नारोपंत अमीन क्षेत्र
सेखदार व संकराजी मजकूर
जाखदेउ कारकून क्षेत्र
मजकूर राघोजी
महाजनानि क्षेत्र मजकूर
(येथून पुढे ११ ओळी गाहाळ झाल्या आहेत)
निवाडास राजी जाहाले मग बालक्रुस्ण चंद्रभागा + + + + + देवाचे पायरीपासी उभे राहून तुलसी कोवेरीचे हाती काढून दीधली कोवेरीस व कोवेरीचा घरातील भावास समंध नाही. ऐस जाहले बालक्रुस्णभटाचा वाडा त्याच्या हवाला केला असे कोवेरीपासी कागद असेली तो रद असे वाडाचे बाबे कावेरीस समंध नाही इचा गोत्रज कोण्ही उभा राहील त्यास बालक्रुस्णभटाच्या वाडियास समंध नाही आर्थेआर्थे समंध नाही बालक्रुस्णभटाचे घरातील भाऊ उभे राहातील त्यास बालक्रुस्णभट त्याचे समंध जे करितील वरकडाजण देयास समंध नाही हा माहजर सही पत्र वली सुमार २६ सवीस बि॥ पंढरी त्रिमल थिटे कुलकर्णी क्षेत्र मा। घरच भाढा १२ बारा रुपया पांडुरंगाच्यारीकडून याव
अनंताचार्ये उंब्रजि साक्षि पत्रप्रमाणे
रघुनाथभट देवले साक्षि उपेंद्राचार्य ढोले वाईकर
नारायणभट केतुरकर साक्षि नरसिंदासभट्ट तोळ
णलक्ष्मभ देवले साक्षि व्यंकटभट देवले साक्षि
नारायणभट केतुरकर साक्षि नरसींदाभट्ट तोळ
रडी गोविंदायो
शेषभट्ट टोळ साक्षि
गोही
कोनेरी रघुनाथ बडवे सोमाजी जनार्दन ताटे
आउजी रायाजी बडवे पंढरी त्रिमल थिटे
रामाजी यलो बडवे गोपाल आराध्या
विठल गोपाल बडवे
गोविंद विठल बडवे
खंडावा पुजारा