लेखांक २१५ श्रीविठलप्रसन १६११
पंढरपूर
तीर्थस्वरूप राजमान्य वेदमूर्ति राजश्री माधवाच्यारे टोणपे
क्षेत्र माहाराजाचे सेवेसी
सेवक गोंदजी व दताजी देसमुख व नीराजी नरसींह देसपांडे पा। कासेगाउ सु॥सन हजार १०९९ दंडवत अनुक्रमें साष्टांगनमस्कार विनंति उपरी आपण माहाराजासी परगणेमुले वरशासन होनु २
दोनी कबूल केले आहेती माहाराजासी वरसाचे वरसास पावते करून कृस्णातीरी दिल्हे आहे पारंपार चालऊन यास अंतर पडिणार नाही
वाग्दत्तं मनोदत्तं धारादत्तं न दियते । षष्टिवर्षसहस्राणि विष्टायां जायते कृमिः ॥१॥