लेखांक २१४ १६०९ आषाढ शुध्द
(फारसी मजकूर)
सके १६०९ प्रभवनाम संवछरे आशाढ सुध चौदासी तदिवसी बावकृस्टणभट बिन नागेशभट काले यासि पांडुरंगभट बिन नागोहरी याने लिहून दिधले ऐसे जे तु + + + पदरी धरिले ऐस जे आपण + + + परगणे करकब येथील पा + + + व पांढरी व काली हे रायाजी जनार्दन यास लेहून दिधली आपणास न पुसता आपली तकसीम व आपाजी सिवाजीची तकसीम मिरासी करून दिधली काय सबब ह्मणौउनु तरी आपणे उहाराचे सेत अर्जावरी आपणे व बापाने हि केले नाही ऐसे असता आपाजी काला याने आपणास हाक तकाचे लाविले त्यास आपणास करायासि ताकती नाही ह्मणउनु राजश्री रायाजी जनार्दन जागिरदार यापासुनु पैका न घेता उगे च लेहून दिधले ते वेलेसी तुमच्या काल्याचा दो तकसिमेचा उजूर केला तेधवा त्रिबक बडिवा व नीरा आराध्या बोलिला जे त्याचा भाऊ भिकाजीची आमची आणभाश जाली आहे आह्मी दीधलीयाने तीही दिधले च आहे ऐसे बोलिले हे राजश्री जागिरदारास हि विदित असे व त्यास हि पत्र लेहून दिधले आहे जे याच्या दोन्ही तकसीमा येही दीधल्या नसता आपण स्वहस्त केले तरी माहाराजे याचे यासि फिराउनु देणे ह्मणउनु पत्र लेहून दिधले आहे जे याच्या दोन्ही तकसीमा येही दीधल्या नसता आपण स्वहस्त केले तरी माहाराजे याचे यासि फिराउनु देणे ह्मणउनु पत्र लेहून दिधले असे आपण हि राजश्री जागिरदारापासी जाउनु सोडउनु देउनु यासि वाइदा मार्गेस्वरी पौर्णमासीचा केला असे मी वाइदियास + + + तरी आपला बाप नागो हरी सोडउनु घेईल हे लिहिले सही स्वहस्त पांडुरंग बिन नागो हरीभटी आपाजी बिन नारो हरीभटी स्वहस्त