लेखांक २१३ १६०९ वैशाख शुध्द ३
सके १६०९ प्रभवनाम संवत्छरे वैशाख सुध त्रितीया अदीतवासर सु॥ सबा समानीन अलफ सन १०९५ कारणे राजश्री त्रींबक काकाजी व राघो काकाजी यासि होनाजी बाबाजी व नागोजी बाबाजी देसकुलकर्णी का। सांगोला पा। माण लेहून दीधले पत्र ऐसे जे आका। भालवणी व ह्मैसवड व का। कसेगाऊ हे आपले वतने आहेती ते एरीसदार रेडून खाताती ऐसीयासि आपण सोडवावी तरी आपणापासि सोडवाविया ताखत नाही या करिता तुह्मास पाठेबा केले असे तरी आह्मी तीन्ही वतनाचे देवखत करावी तुह्मी आमची पाठी राखावी व जे खर्च दरबारी पडेल तो आपणे द्यावीयासि समंध नाही तो दरबारी खर्च तुह्मी खुद देऊन वतने सोडवावी त्यामधे जे वतन साधून येईल त्यामधे नीमे देसकुलकर्णा तकसीम देऊ तुह्मी आमचे शर्ती मर्बीनसी पाठी राखावे आपणापासोन लिहिल्या प्रा। अतर पडणार नाही हे आपले कुलस्वामी साक्षे असे व पूर्वजाची आण असे हे पत्र लिहून दीधले सही यासि मान व नाव आमचे व बिकलम आमचे असे व रुमाल पान तश्रीफ पानमान नीमे तुमचे आमचे असे हे लिहून दीधले सही ता। छ १ रा।खर
बि॥ होनाजी बाबाजी व नागोजी बाबाजी देसकुलकर्णी