लेखांक १९० १६४८ मार्गशीर्ष वद्य ७
(फारसी मजकूर)
मुतसदियानी मोहिमात हाल व इस्तकबाल देशमुखानि व देशपांडे व मोकदमानि व रैया व मुजारयानी परगणे हुकेरी सरकार रायबाग सुबेदारुल जफर बिजापूर सन ११३६ बिदानंद दरीविला मौजे चिंचवाड हवेली परगणे मजकूर दरोबस्त इनाम बनाम तमाम जुनारदारानि साकीन कोलापूर बतसदुक फरक मुबारक हजरत मोकरर करून दिले असे दुंबाला करून देणे माशारनिले तेथील माहासूल बमय अवलाद अहफाद सरफ मईशीयत करोन दुवा गोई दवाम दौलत अबदपैवद मशगुल राहातील कुलबाब कुलकानू माफद्य केले असे मुजाहीम व होणे दरीबाब ताकीद दानंद मोर्तब शूद छ २० माहे रबिलाखर