लेखांक १८८ १६२५ अधिक श्रावण शुध्द ११
(फारसी मजकूर)
इजत असार आमीलानि ता। तारले पा। कोलापूर सु॥सन १११३ मालूम नुमायद मुकुद नारायण सरदेशमुख पा। मजकूरयाचे हक अमानत मणुन पेसजी मिसली जाहली होती तरी हली देसाई मजकुरावरी नजर एनायत फर्माऊन याचे हक व विस्वा सायर व गला बदस्तूर साबिक सुधामत चालिले आहे तेणेप्रमाणे दुमाला करणे दरीबाब ताकीद असल नकल लेहून तालीक परतून दीजे रा। छ ९ रबिलोवल