लेखांक १७०
ता नारायणभट्ट असता भक्षित होत मग अमचे बाप व अह्मी बोलिलो जे ते सेत पदमणभट्ट बीन शकरभट्ट उपाध्ये हैबतखान यानी अह्मास पत्र पाठविले त्यावरून ते इनाम केले ह्मणुन बोलिले व तुह्मी बोलिलेति जे ते इनाम तुमचे पदमणभट्टाचे कागदावरून कला नाही यानिमित्य तुह्मा अह्मामध्ये बहुत दिवस कळह होता त नि मित्त ब्रह्मसभा केलि तेथे प्रमाणावेगळे निवडेना ऐसे विचारुन तुमचे अमचे तकरीर घेतली त्यावरी अह्मी तकरीर केलि जे नारायेणभट्टे पदमणभट्टाच्या पाउ चावराच्या पसरणीच्या खुर्दखतावरून अर्ध चावर करून पसरणीस भक्षितो व पदमणभट्टाचे पत्र तुह्मापासि अहे ऐसे अपला बाप रामेसवरभट्ट बोलत होता ते सत्य ऐसे धुतपापी पुत्र धरुन प्रमाण करून दशरात्रि उतरलो तरि पाव चावर .।. भक्षुन त्यावरि तुह्मी तकरीर केली जे नारायणभट्टे पदमणभट्टाबाबेति पसरणीच्या पाउ चावराच्या खुर्दखतावरुन पसरणीस अर्धा चावर केला नाही व त्याचे खुर्दखत दिसत नाहि याप्रमाणे धुतपापी प्रमाण घेउन दशरात्र उतरलीया तुह्मास पाव चावर द्यावया सबध नाहि ऐसीया तकरिराप्रमाणे तुह्मी तकरिरा घेउन प्रमाण करावया धोमासि चालिलेस बसेटीचे दुकानी बैसलेसि अह्मास पाचरिले अह्मी तुह्मासागति यावया लागलो याउपेरि अह्मास व पसर्णीचा नारायणभट्टाबाबेति अर्ध चावरास सबध नाहि व पदमणभट्टाबाबेति खुर्दखत तुह्मापासुन गेले ते तुह्मास अह्मी मागावया सबध नाहि याउपरि पसर्णीच्या नारायणभट्टाच्या अर्ध चावर ॥ व पदमणभट्टाचे पत्र मागोन तरि अनामिक विर्याचे असो हे पत्र सत्य लिहिल्याप्रमाणे अकभट्ट व एकभट्टास मान्य हे सत्य ॥
साक्षी
वैदिक महादेभट्ट पारनेरकर नरसिंभट्ट टोळ बसंभट्ट धवलीकर शंकरभट्ट शेडे नारायणभट्ट सातपुते पत्रप्रमाणे कानभट्ट ठिठे बाळंभट्ट ढेकुणे महाबळेश्वरकर त्रिंबकभट्ट माभाष्य गोविंदभट्ट भिकंभट्ट ठिठे ॥ शंकरभट्ट गिरे रामभट्ट पिठे माहादेभट्ट सुस्राण विठलभट्ट आचार्य नरस जोसी रामभट्ट पुण्यस्तभपत्र नागेशभट्ट नवग्रह मेरुभट्ट ठिठे साक्षी लक्ष्मीधरभट्ट माडोगणे चितामणि जोशी देवगिरिकर गोविंदभट्ट सुस्राण गोविंदभट्ट शेडे नरहरिभट्ट अफळे विश्वनाथभट्ट गिरजे भानभट्ट दिघे कृष्ण जोसी लिग जोसी नारायण जोसी कडत जोसी विरेश्वरभट्ट ठिठे .शभुभट्ट प्रभुणे विश्वनाथ पुराणिक रघुनाथभट्ट मोने लिगभट्ट थिटे नारायणभट्ट धोमकर |
ग्रहस्त संभो अनंत देसकुलकर्णी |