लेखांक १६९
तद्दिनी नरशिंभट व नारायणभट चित्राव या उभयतामध्ये इनाम बोर (ख)ळ चावर एक व किण्ही चावर अर्ध या दीढा चावराच्या ठाणेपट्या निमित परस्परे कळह होत होता पूर्वी मूळवृत्ति दोनि पिढ्या यथाशे भक्षित होते त्याउपेरि नरशिंभट्टी स्वशक्तीने मूळवृत्तीवरि ठाणेपट्या बाद केळ्या त्याचा अश मूळाशाप्रमाणे नारायणभट्ट भागो ळागळो त्यास नरशिंभट्ट बोळिळे किं हे आपण साध्य केले याचा अश तुह्मास ने दु ऐसे परस्परे कळह करून सभेस आळे मग सभासदी धर्मशास्त्र निर्णय पाहाता नरशींभट्टास नूतन साध्याचे दोनि अश द्यावे ऐसा नेम झाळा त्याउपेरी सभासदी नरशिंभट्टास पुशिळे किं या कार्याविशयी नारायणभट्ट तुह्मास सहा सहाय झाळा किं नाही त्यास नरशिभट्ट सभेस उतर दिळहे या कार्यास नारायणभट्ट अपणास सहाय झाले यानिमित्त नारायणभट्टांच्या अशावरि जे नूतनार्जित त्यामध्ये तीन अश नारायणभट्टास ने द्यावे एक अंश नरशिभट्टास द्यावा याप्रमाणे उभयतानी भक्षावे याप्रमाणे शंकरभट्टे अपळ्या अशावरि नूतनार्जिताचा एक अश अपण घ्यावा दोनि अश नरशिंभट्टास द्यावे
उभयताच्या तकदीरा घेतल्या त्यास नारायणभट्टे तकरीद केळी ऐसी जे नरशिभट्टी ३ मूळवृत्तीवरून पट्या बाद केळ्या यास आपण ही श्रम करीत आळो व नरशिभट्टी तकरीद केली तुह्मी समस्त धर्मशास्त्रप्रमाणे जे सागाळ त्यास अपण मान्य मग उभयताच्या तकरीदा घेउन