लेखांक १६१ १६१४ कार्तिक वद्य १३
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके १९ अंगिरा नाम संवत्छर कार्तीक बहुल त्रयोदसी मंदवासर क्षत्रियकुलावतंस श्री राजाराम छत्रपती याणि राजश्री देशाधिकारी व लेखक वर्तमान व भावी प्रांत वाई यासि आज्ञा केली ऐसी जे भवानीगिरी गोसावी याणि चंदीचे मुकामी स्वामि समीप येऊन विदित केले की श्री गोसावी स्थल कसबे नींब प्रा। मजकूर येथे यांची समाधी आहे आनादि बहुत पुण्यथल जागृत जगप्रख्यात आहे त्याचे परंपरेचे आपण सिष्यवर्ग या स्थली राहोन श्री स्वामिची समाधीची सेवा करून आहो ऐसीयासि समाधिस्थानी धूप दीप पूजा नैवेद्य पुण्यतिथीउत्छह चालावयास अवकास नाही स्वामी धर्मप्रभु आहेत तरी एक गाव इनाम करून दीधलीया श्री चे समाधिस्थानी पूजा नैवेद्य उत्छह व अतीतअभ्यागतास आन्न देऊन स्वामिस व स्वामीच्या राज्यास कल्याणाभिवृध्दी चितून समाधानरूप असोन ह्मणौन शृत केले त्याजवरून मनास आणिता श्री ची समाधी बहुता काळांची प्रख्यात स्थल आहे ऐसे जाणोन पूजा नैवेद्य उत्छह अतीतास आन्न चालावयास निमित्य नूतन इनाम मौजे इडमीडे सा। नीब प्रा। मजकूर देह १ एक रास कुलबाब कुलकानु देखील हालीपटी व पेस्तरपटी झाडझाडोरा पडिले पानसहित खेरीज हकदार व इनामती करून गाव इनाम दिल्हा आसे तरी चतुसीमा भूमीसहित गाव याचे दुमाल करणे या पत्राची प्रती लिहून घेऊन मुख्य पत्र समाधीचे आधिपत्यकर्ता गोसावीयास परतोन देणे निदेश समक्ष
तेरीख २७ माहे रबिलोवल
रबिलोवल सु॥ सलास तिसैन अलफ
बार सूद सुरु सूद बार