लेखांक ११८ १५८७ कार्तिक वद्य २
॥ अज रखतखाने मसुरल अनाम राजश्री रायाजी राजे घोरपडे साहेब दामदौलतहू ता। हुदेदारानिं वा मोकदमानि मौजे येरोळ पा। कराहाडी सु।सान सीत सितैन अलफ कारणे राजश्री जगदगुरु सदानंद गोसावी याचा इनाम मौजे मजकुरी बिघे
५ सालाबाद कुलबाब कुलकानू चालत असता मग पडी नाकीर्दी कस्ट मशागत उपाय नाही ह्मणौउनु टाकिला होता अता गुरुजी गोसावीयासि येउनु पाहिजे ह्मणउन मागोन घेतले तरी त्याचा इनामाचा हद माहदूद पडिलिया बरहुकूम त्याचे दुमाला करून चालो देणे दुसरियानें फिरायादी आलिया ताकीद होईल खुर्दखत वाचून तालीक लिहून घेऊन असल फिराऊन दीजे मो। यास इस्कील करील त्यास हिंदूस गायेची आण असे मुसलमानास सोराची आण असे मो।
तेरीख १५ माहे जमादिलोवल