लेखांक ११० १५८३ श्रावण शुध्द १२
अजरखतखाने खुदायेवंद खान अलीशान खाने अजम शर्जाखाने साहेब तुली दयाम दौलतहू बजानीब कारकुनानी हाल व इस्तकबाल व देसमुखानी पा। वाई बिदानंद सु॥ इसने सितैन अलफ दरीविले बेस्मी नरसिव्हभट बिन रगभट चित्राऊ हुजूर येऊन मालूम केले जे आपणासी इनाम जमीन चावर .॥. नीम दर सवाद मौजे पसरणी थल वाकेवाडी नजीक सिदनाथवाडी वाट माभलेस्वर दो। माहासूल व नखतयाती व खा। गला व सारा व बेठीबेगारी फर्मायेसी व बैलकडी व मोहीमपटी व घीउ ता। ठाणा व ता। देहाये बा। खुर्दखते वजीरानी मुकासाइयानी माजी कारकीर्दी दर कारकीर्दी भोगवटा व तसरुफाती सालाबाद चालिले आहे हाली पा। माळूर साहेबास मुकासा अर्जानी जाला आहे माहाली कारकून ताजा खुर्दखताचा उजूर करिताति तरी साहेबी नजर यैनायत फर्माखत मर्हामत करावया रजा फर्माविले पाहिजे ह्मणौऊनु तरी बराये मालुमाती खातिरेसी आणौऊनु सदरहू इनाम जमीन चावर .॥. नीम दर सवाद मौजे मा। पा। मा।कुर दो। माहासूल नखयाती व बाबा बाये सदरहू प्रमाणे बा। खुर्दखते वजीरानी मुकासाइयानी माजी कार कीर्दी दर कारकीर्दी भोगवटा तसरुफाती सालाबाद ता। सालगुदस्ता चालिळे असेली तेणे प्रमाणे दुमाला करून चालवीजे अवळाद व अहफवाद चालवीजे दर हर साळा ताज्या खुर्दखताचा उजूर न कीजे तालीक लेहौनु घेउनु असेली इनामदार मजकुरास फिराऊनु दीजे पा। हुजूर मोर्तब सूद
रुजू सुरु -
निवीस
तेरीख १० माहे जिल्हेज
जिल्हेज
पौ। छ १७ माहे मोहरम
सर्जाखान दुमाल मिसेल