लेखांक १०८ १५८२ आषाढ वद्य ७
(फारसी मजकूर)
बजानेब कारकुनानि हाल व इस्तकबाल देसमुखानि पा। वाई मालूम बाद सु॥सन इहिदे सितैन अलफ दरीविला अमणभाट बिन दामोधरभट क्षीरसागर सेकीन मौजे एकबे पा। मजकूर हुजूर येउनु मालूम केले जे आपणासी इनाम जमीन चावर नीम .॥. दर सवाद मौजे मजकूर बर तरफ बि॥ विठोजी पटेल नजीक तरफ अंबाजी बगा + + + + + हीस सूर जमीन चावर बित .।.
तरफ विठोजी पटेल नजीक
गवदरी चाकर वार + + .।.
देखील माहासूल नकादयाती व जमीन लाजीमात व बेलेकटी व मोहीमखर्च व बाजे बाब व बेठ बेगार कुलबाब मर्हामत असे दरीबाब फर्माउन हुमायून व खु॥ होय मोखासाइयानि माजी व खान अफजलखान मरहूमी दर साल सन सीत खमसैन बतेरीख २५ माहे सौवाल सनद सादीर असे हाली पा। मजकूर साहेबासी मोकासा अर्जानी जाहले आहे साहेबी नजर इनायत करून सदरहू इनाम दुंबाला मर्हामत कराव्या रजा होय ह्मणौउनु तरी बराय मालुमात ऊ खातीरेसी आणउनु सदरहू इनाम जमीन चावर नीम ॥ दर सवाद मौजे मजकूर दुंबाला केले असे माहाली भोगवटा तसरुफात सालाबाद ता। सालगु॥ कारकीर्दी खा। अफजलखान मरहूमी चालिलेप्रमाणे दुंबाल (करून) दीजे हर साल खु॥चे उजूर न कीजे तालीक लिहून घेऊन असली परतून दीजे मोर्तब
तेरीख १५ माहे सफर
पौ छ १६ रबिलोवल