लेखांक १०६ १५८१ भाद्रपद वद्य ३
अज रखतखाने खुदायवंद मीया अजम मीया दरवेश महमद खु॥ दौलतहू बजानब कारकुनानी हिसार जाउली बिदानद सु॥ सितईन अलफ दरीविळ नारायणभट बिन गोपीनाथभट चित्राउ सा। का। मा। हुजूर येउनु मालूम केले जे आपणास + + + जमीन चावर नीम .॥. दर सवाद + + + + हिसार मजकूर सालाबाद चालिले + + + + साहेबास अर्जानी जाले आहे माहाली कारकून खुर्दखताचा उजूर करिताती साहेबी नजर येनायत करून खुर्दखत देविले पाहिजे मालूम जाले बराय अरीजे ऊ खातिरेस आणौनु जमीन चावर नीम .॥. देविले असे सालाबाद जैसे चालिल असेली तेणेप्रमाणे चालवीजे तालीक घेउनु असेली इनामदार मजकुरास फिराऊनु देणे दर हर साल खुर्दखताचा उजूर न कीजे
तेरीख १६ माहे जिल्हेज
जिल्हेज