लेखांक ९७ १५७८ कार्तिक वद्य ६
(फारसी मजकूर)
अज दिवाण पा। वांई ता। मोकदमानि मौजे एकंबे सा। कोरेगाऊ पा। मजकूर सु॥ सबा खमसैन अलफ बा। खु॥ रा। छ २५ माहे शौवाल दर साल सन सीत खमसैन अलफ सादीर जाले तेथे रजा जे अमणभट बिन दामोधरभट क्षीरसागर जुनारदार सो। कसबे मौजे एकबे पा। मजकूर हुजूर येऊन मालूम केले जे आपणास इनाम चावर नीम .॥. दर सवाद मौजे मजकूर दर तरफे बितपसील
तरफ विठोजी पाटील तरफ अंबाजी बा। महिसा-
नजीक गावदरी जमीन सूर जमीन चावर .।.
चावर .।.
देाा माहसूल व ना। व जमी लावजिमात व बेलेकटी व मोहीमखर्च बाजेबाब वेठ बेगार कुलबाब बिमोजिब फर्माउन हुमायुन व खु॥ मोकासाइनी माजी खुर्दखत साबिका प्रमाणे भोगवटा व तसरुफाती ता। सालगु॥ दुबाले होउनु चालत असे हाली माहली कारकुनी ताजा खु॥ताचे उजूर करून दुबाले करीत नाही नजर इनायत फर्माऊन दुंबाला फर्मावया रजा होय ह्मणऊन मालूम जाहले मेबायद के सदरहू इनाम बरहुकूम भोगवटा व तसरुफाती सालाबद ता। साल गा। जैसे चालिले असेल त्याणेप्रमाणे दुबाले करून चालवणे दर हर साला खु॥ताचे उजूर न कीजे तालीक लेहून घेउनु असल परतून दीजे भौगवटा व मिसेली ठाणा दर साल सन सीत खमसैन अलफ छ २९ माहे मोहरम जमीन देखील बाबहाय दुबाला केले असे भोगवटा व तसरुफाती पाहून ता। सालगु॥ चालिलेप्रमाणे सालमजगुरास जमीन दुंबाला कीजे तालीक लेहून घेऊन असेल मिसेली इनामदार मजकुरापासि परतून दीजे मोर्तब सूद
तेरीख १९ माहे मोहरम
मोहरम