लेखांक ९३ १५७५ चैत्र शुध्द ४
(फारसी मजकूर)
अज रखतखाने खोदायबंद खान आलीशान खा। अफजलखान माहमदशाही खुलीदयामदौलतहू बजानेब कारकुनानि हाल व इस्तकबाल व देसमुखानि पा। वाई बिदानद सु॥सन सलास खमसैन अलफ दरीविले नरसींहभट बिन रंगभट बिन गोपीनाथभट चित्राउ हुजरू येऊन मालूम केले जे अपले पिदर रंगभट बिन गोपीनाथभट इनाम जमीन नीम चावर दर सवाद मौजे पसर्णी थल वाकेवाडी नजीक सिदनाथवाडी वाट माहाभालेस्वर देखील माहासूल व नकदयादी व खरीदी गला व सरा वा बेठबेगार फर्माइसी वा बेलेकटी व मोहीमपटी व घेऊ ता। ठाणा वा ता। देहाय बरहुकूम खुर्दखत मोकासाइयानि माजी मुतैन रवा अस्त तेणेप्रमाणे भोगवटा व तसरुफती सालाबाद तागाईत सालगुदस्त चालिले आहे साल मजकूर माहली कारकुनानी ताजा खुर्दखताचे उजूर करून इस्कील केले आहे नजर इनायत फर्माउनु सदरहू इनाम दुबाला फर्मावया रजा होय ह्मणुनु मालूम जाहले मेबायदके सदरहू इनाम खुर्दखत मोकासाइयानि माजी व खुर्दखत माजी व खुर्दखत साबीकाप्रमाणे भोगवटा व तसरुफाती सालाबाद तागाईत सालगुदस्त जैसे चालिले असेल त्याणेप्रमाणे दुबाला कीजे सालगु॥ उचापती केले असेल तेचे उजूर न कीजे व औलाद अहफवाद चालवीजे दर हर खुर्दखताचे उजूर न कीजे तालीक लेहून घेउनु असल खुर्दखत परतुनु दीजे पा। हुजरु मोर्तब सू
तेरीख २
जमादिलोवल सुरु सूद