लेखांक ८८ १५७१ अधिक आषाढ वद्य ५
विरोधी संवत्सरे अधिक आषाढ वदि पंचमी सोमवार तदिनी अउभट्ट व शंकरभट्टास अकोजीने व येकोजीने लेहुन दिधले जे पदमणभट्टाचे पसरणीचे इनामाचे पत्रानिमित्त कलह असे तनिमित्त अम्हदखानाचे पत्र आज्ञा करून तृतीय स्थानी ठेविले होते ते पाचाचा उत्तरे दिधलेयाउपेरि पाच जण जे स्थळ देतील त्या स्थळास जाउन निर्णय करुन जो न ये तो ब्रह्मसभेचा अन्याई सत्य
चे दिवाळीस जा।