लेखांक ८१ १५६०
बहूधान्य संवत्सरे शुध्द अष्टमी मंगळवार तद्दिनि रामेश्वरभट्ट व नारायणभट्ट व रंगभट्ट व अउजि चित्राउ याचा *इनामाचा विभाग झाला ऐसा जे मौजे बोरखळ चावर १ मौजे किणहि चावर .॥.
यासि
बोरखळ किणहि
अउभट्ट चावर .॥. अउभट्ट .l.
रगभट्ट चावर .l. तुकोजि बिघे १५
नारायणभट्ट .l. सूर्याजि तरफ बिघे १५
रामेश्वरभट्ट तुकोजि तरफ १५
सूर्याजि तरफ १५
येणेप्रमाणे यत्न करून विभाग भक्षणे याप्रमाणे भक्षून सुखे असणे परस्परे कळह करायासि संबंध नाहि दस्तूर रंगभट्ट
साक्षि
माहादे भट्ट अकंभट्ट येकंभट्ट पत्रप्रमाणे मान्य
कृष्ण जोसि अउजिस पत्र प्रमाणे मान्य
गोविंद जोसि
नारायेण जोसि
येकभट्ट