लेखांक ८० १५५५ वैशाख शुध्द ११
(फारसी मजकूर)
अज रखतखाने खु॥ खाने अलीशान खाने अजम रणदुला फराहादखान खु॥ दौलतहू बजानेबु कारकुनानि पा। वाई बिदानद सु॥ अर्बा सलासीन अलफ बो। रगभट बिन गोपीनाथभट चित्राउ सो। का। मजकूरु हुजूर येउनु अर्ज केला ऐसा जे आपला मामा हरीभट बिन विष्णुभट देऊरकर यासी इनाम जमीन चावर नीम .॥. दर सवाद मौजे पसरणी पा। मजकूरु थल वाकेवाडी सीव नजीक सिदनाथवाडी माहाबलेस्वरमार्गावजली दो। महसूल व नखतयाती व खा। गला व सारा व बेठबेगार व फर्मासी ता। ठाणे व ता। देहाय कारकीर्दी दर कारकीर्दी वजीरानि सालाबाद ता। सालुगा। चालिले आहे हरभट मजकूरु तो निपुत्रीक होता आपण त्याचा भाणजा जाणौनु मरते वखती सदरहू इनामाचे कागद आपणासी देउनु इनाम दान दिधला त्या सी मरौनु बहुत दिवस जाले तेपासुनु आपण त्याचे नावे कागद करुनु ता। सालगु॥ इनामाचा हक आपण खात आहे तरी साहेबी नजर अनायत फर्माउनु सदरहू इनामाचा कागद आपले नावे करून देविले पाहिजे काम खैरयतीचे आहे दरीबाब सरजाम होय मालूम जाले तरी हरीभट बिन विष्णुभट याचा इनाम जमीन चावर नीम .॥. दर सवाद मौजे पसरणी तो तेही मरते वखती रगभट बिन गोपीनाथभट चित्राउ यास दान दीधले आहे तेणे च प्रमाणे हुजुरूनु सदरहू इनाम रगभट बिन गोपीनाथभट चित्राउ यासी दीधला आहे दो। महसूल व नखतयाती व खा गला व सारा व बेठी बेगारी ता। ठाणे व ता। देहाय जैसे ता। सालगु॥ तशृफाती जाली असेल तेणे बा। चालवीजे दर हर साल खु॥ उजूर न कीजे तुह्मी तालीक घेउनु असेल इनामदार मा। दीजे पा। कारकूनु रा। रखमाजी रखतवान मुकाम शाहापूर बागे सूद मोर्तब सूद
रुजु दफतरखास रुजु शुरुनिवीस
तेरीख ९ माहे साबानु
साबान