लेखांक ७८ १५५४ कार्तिक वद्य ३
(फारसी मजकूर)
अज रखतखाने खुदायवद खान अलीशान खा। अजम रणदुला फरादखान खुलीदयामदौलतहू बजानेब कारकुनानि हाल व इस्तकबाल व देसमुखानि पा। वाई बिदानद सु॥सन सलास सलासीन अलफ बो। बाजी बिन सुदामसेटी पाटणी पा। मजकुरु हुजूर येऊनु मालूम केले जे आपले बापाचे नावे इनाम आहेती तेणेप्रमाणे चाळत आहे त्यापैकी जमीन चावर १ एक आहे सेत दर सवाद कसबे मजकूरु दो। महसूल चालत आहे मोहीमखर्च व बेलेकटी हे आपले दुमाला नाही साहेबी नजर अनायत फर्माउनु आपले दुमाला करावया रजा होय ह्मणौउनु मालूम केले तरी यासि सदरहू चावराची बेलेकटी व मोहीमखर्च हाली मर्हामती करून दीधली असे याचे दुमाला कीजे दर हर साल ताजा खु॥ उजूर न कीजे तालीक घेउनु असेली खुर्दखत फिराउनु दीजे पा। हु॥ कारकून रा। महिमाजी अफराद बाबके मोर्तब
रुजु दफतरखास रुजु शुरुनिवीस
तेरीख १६ माहे रबिलाखर
रबिलाखर ळ॥ मो। कडूस
नजीक भिवरा