लेखांक ३० १६१९
(फारसी मजकूर आठरा ओळी)
महजरनामा अज थाने सुपे सा। जुनर सुबे खुजस्तेबुनियाद सु॥ सन ११०७ बिहुजूर आहालीमवाली बिता।
हजरत काजी शरा माहाराज राजश्री दिवाण
दलसिंगजी फौजदार
पा। मा।र
दा। गिरजोजी आनंदराऊ दा। रामाजी बाबाजी व
आ। देसमुख प्रा। मा।र देवाजी त्रिंबक देसपांडे
प्रा। सुपे
कुतवल व खंडोजी चानगुडे
व मल्हारजी खैरे व काळोजी
भोडवे मोकदम व माहाजन सेटे
का। सुपे
(निशाणी नांगर)
अग्रवादी पश्चमवादी
काकोजी बिन हिरोजी माणकोजी बिन मेऊजी
तकरीरकर्दे अग्रवादी काकोजी बिन हिरोजी आटोले तकरीर केली ऐसी जे आपला मूळपुरुष मेगनाक त्याचे लेक दोगजण वडील साऊनाक धाकला हीरनाक साऊनाक पडिला तो वणगोजी नाइकाचे वेळेस भाडण जाले ते वेळेस पडिला त्याउपरि हीरनाक धाकला होता त्याणे पाटिलकी केली हीरनाक पाटिलकी करिता दस्तूरखाने दिवाणे गर्दन मारिली मग साऊजीचा लेक जैतजी पाटिलकी करू लागला जैतनाक पुणा वणगोजी नाइकाचे भाडणी पडिला पुढे त्याचा भाऊ धाकटा काकोजी त्याणे पाटिलकी केली काकोजीला दाईजाने वीख घातले तो मेला मग माणकोजीचा पणजा मेगनाक पाटिलकी करू लागला तो मेलियावरी आपला बाप हिरोजी गोरा कारभार करू लागला मग गोजेबावीचे मोकदमीचे भांडण पडिले त्याबदल आपला बाप तेथे गेला व माणकोजीचा अजा हिरोजी गावी ठेविला दोघे भाऊ एकमुख होऊन रायाराऊ दौलतमंगळियापासी भांडण पडिले गाव घेतला त्यास पुढे हिरोजी भांडो लागला गोत कात्राबादमांडोगणास घेतले तो राजीक जाले राजिकाकरिता गाव वोस जाला तो तीस वरसे पडिला होता हाली दिवाणे कौल देऊन गाव भरिला आपण गावी आलो भांडत आहो जे आपले वडीलपण खरे हे तकरीर सही
(पश्चमवादी माणकोजीची हि तकरीर अशी च आहे)
सदरहूप्रमाणे तकरीरा हरदूजणी केलीयाउपरि हाजीरमजालसीने पुसिले की तुह्मी कोणे गोस्टीस राजी आला त्यावेरी हरदोजणे गोतमाहास्थळ मौजे पिंपरी गुरो थळ मागितले की आपणास गोत देणे तेथे गोत हरदोजणास सांगेल त्याप्रमाणे वर्तोन ह्मणऊन राजी जाले पिंपरीस जाऊन पांच महिने बैसोन गोते हरदोजणाच्या तकरीरा व कितेक फाते जे मनास आणावयाचे ते आणिले सेवट गोताजवळी गावीचे च सडीस राजी जाले त्यावरून गोते मौजे मजकुरास सडी लिहिली, की समस्त मोकदम व दाही जण व बलुते व मोख्तसर श्रीदेवाचे विहिरीत आंघोळी करून तुळसीच्या माळा गळा घालून आपले लेक हाती धरून तुमचे माथा मागीमाहारीचे अशुध असे चांभारकुंड व डोंबरकुंड व रंगारकुंड वोढून सात मंडले वोढून, त्यात उभे राहाणे श्रीदेवाचे रंगसिळेवर उभे राहाणे तुह्मास गोहत्या ब्रह्महत्या असेती व गुरुद्रोही मात्रागमन सुरापान तुमचे पूर्वज स्वर्गी वाट पाहात आहेत की पुत्र सत्य वदोन उधार करील किंवा लटिके बोलोन नर्की बुडवील धर्मे आपला पिता उधरिला श्रीरघुनाथे पितियाची भाक सत्य केली तैसा तुह्मी आपल्या पूर्वजाचा उधार करून सत्य वदोन नेमस्त करून हरदोजणांत कोणाचे वडीलपण ते लेहोन पाठविणे सडीचे प्रतिउत्तर लेहोन पाठविणे त्याप्रमाणे
१ समस्त भाऊ
१ जथे चौगुले मेळगर
१ कुळे
१ जथे माळी
१ जथे गोलाड
१ बलुते
यानी गाही दिधलिया जे वडीलपण अमक्याचे इ. इ. इ.